काशिद समुद्रावर पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक बुडाले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

रायगड (Raigad) मधील काशिद समुद्रावर (Kashid Beach) पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

अभिषेक म्हात्रे असे तरुणाचे नाव असून तो पनवेल येथे राहणारा होता. तर अभिषेक हा आपल्या मैत्रिणींसोबत मुरुड मधील फार्म हाऊसवर पर्यटनासाठी आला होता. रविवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणींसोबत काशिद समुद्रावर गेल्यावर पाण्यात पुढे गेले. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेकसह त्याची एक मैत्रिण बुडाली. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अन्य मैत्रिणीने दोघांच्या बचावासाठी आरडाओरड सुरु केली. तर घटनास्थळी असलेल्या व्यक्तींनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. (Cyclone Vayu मुळे मुंबई शहराला धोका नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आवाहन)

तसेच अभिषेक आणि त्याच्या बुडालेल्या मैत्रिणीला समुद्रातून बाहेर काढले. त्यानंतर जवळच असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याने सांगण्यात आले.