रत्नागिरी (Ratnagiri) येथील एका शेतात बस उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रस्ता खचल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खचला गेला आहे. तर आज सकाळच्या वेळेस एका शेताजवळून बस जात असताना ती रस्त्या खचल्यामुळे शेताच्या बाजूला झुकली गेली. त्यामुळे चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने ती उलटली.(रत्नागिरी: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधान)
परंतु या मध्ये कोणतीही जीवतहानी झालेली नाही. मात्र जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसेच ग्रामस्थांकडून या बसमधील अन्य जणांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.