प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील हडपसर (Hadapsar) परिसरात शुक्रवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. आरोपीने पीडित तरूणीला घरी सोडतो, असे सांगत त्याने तिला लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून तेथून पसार झाल्याची माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.
अभय बनसोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अभय आणि पीडित तरुणी एकाच प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत आहेत. पीडित तरूणी ही गेल्या काही दिवसांपासून तिथे काम करत असून आरोपीला त्या ठिकाणी कामाला लागून केवळ दहाच दिवस झाले आहेत. दरम्यान, 13 तारखेला आरोपीने पीडित तरुणीला घरी सोडतो, असे सांगत तिला सोबत घेऊन गेला. मात्र, आरोपीने तिला घरी न सोडला लॉजवर घेऊन गेला. दरम्यान, त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून पसार झाला. यानंतर पीडित तरुणी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडिताच्या दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- Dombivli Murder: धक्कादायक! डोंबिवली येथे दार ठोठवले म्हणून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटकेत
संपूर्ण देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचबरोबर दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारीच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे पुणे शहरदेखील बिहारच्या दिशेने वाटचाल करत आहे की काय? अशी भिती अनेकांच्या मनात येऊ लागली आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यात बलात्काराच्या अनेक घडल्या आहेत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.