Dombivli Murder: धक्कादायक! डोंबिवली येथे दार ठोठवले म्हणून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटकेत

दार ठोठवले म्हणून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना डोंबिवली (Dombivli) येथे शनिवारी घडली आहे.

Dombivli Murder: धक्कादायक! डोंबिवली येथे दार ठोठवले म्हणून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटकेत
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

दार ठोठवले म्हणून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना डोंबिवली (Dombivli) येथे शनिवारी घडली आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे, अशी माहिती टीव्ही9 ने आपल्या वृत्तात दिली आहे.

दिपक मोरे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दिपक मोरे हा डोंबिवली पूर्वेतील ज्योतीनगर परिसरातील रहिवाशी आहे. याच परिसरात राहणाऱ्या संजय गवळी याने शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दिपक मोरेचे दार ठोठवले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आहे. याच वादातून दिपक मोरेने संजय गवळीला दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. यात संजय गवळीचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी दीपक मोरे याला अटक करुन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- सातारा: प्रतापगडावर अफजल खान कबर परिसरात महिलेचा मृतदेह; फुटलेल्या बांगड्या, रक्ताचे डागही आढळले

या घटनेसंदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक मोरे याच्या पहिल्या पत्नीसोबत संजय गवळीचे अनैतिक संबंध होते, असा संशय त्याला होता. यावरून दोघांमधील वाद विकोपास गेल्याचे समजत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2020 09:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).