Rajyasabha MP Oath Ceremony: शरद पवार, रामदास आठवले, छत्रपती उदयनराजे भोसले, राजीव सातव आदी नेते घेणार खासदारकीची शपथ
Rajyasabha MP Oath Ceremony (PC - Facebook)

आज राजधानी दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा (Rajyasabha MP Oath Ceremony) पार पडणार आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav), भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale) खासदारकीची शपथ घेणार आहेत. राज्यसभा सदनात सकाळी 11 वाजता हा शपथ सोहळा पार पडणार आहे.

आज खासदारकीची शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे. यात भाजपा नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड, रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख शरद पवार, राष्ट्रवादी नेत्या फौजिया खान, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Journalist Vikram Joshi Dies: भाचीची छेड काढल्याचा विरोध केलेल्या विक्रम जोशी यांचा गोळीबारानंतर उपचारा दरम्यान मृत्यू)

राज्यातील 7 नेत्यांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली होती. त्यापैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. याशिवाय राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने राजसभेच्या सदस्यत्वाची निवडणूक लढवली होती. त्यांना त्यांना यश मिळाल. तसेच शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पहिल्यांदाच खासदार पदी निवडून आल्या. आज महाराष्ट्रातील हे सातही नेते खासदारकीची शपथ घेणार आहेत.