Raju Shetti: राजू शेट्टी यांचे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या होणार बैठक
Raju Shetti (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पावसामुळे कोल्हापूरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचे राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटून गेले तरी पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर, जलसमाधीचा (Jal Samadhi Andolan) इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्यासमवेत उद्या दुपारी तीन वाजता वर्षा शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समोर येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे नियंत्रण दिले आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात उद्या 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: मंदिरे उघडण्यासाठी नव्हेतर, कोरोना विरोधात आंदोलन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

ट्वीट-

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढलेल्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. पूरग्रस्तांना 2019 च्या निकषांप्रमाणे मदत मिळावी, यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. तसेच आज 4 वाजेपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जलसमाधीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.