
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट झाल्याने राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्यापही मंदिरे उघडण्याची (Temples In Maharashtra) परवानगी न दिल्याने विरोधकांनी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी नव्हेतर, कोरोना विरोधात आंदोलन करा, असे उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता विरोधकांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशात गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच लसीकरणानंतरही मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच राज्यात वाढणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाच्या आजाराबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. राज्यात मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या रुग्णांच्या प्रकरणातही वाढ होताना दिसत आहे. पण, त्यांची लक्षणे वेगळी आहेत. यामुळे अशा रुग्णांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- कोविड 19च्या तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझा डॉक्टर : ऑनलाईन वैद्यकीय परिषद; इथे पहा लाईव्ह
आम्ही ऑक्सिजनचे 450 पीएसए संयंत्र उभारण्याची योजना आखत आहोत आणि राज्यभरात स्टोरेज प्लांट उभारण्याची आमची योजना आहे. मागच्या वेळी आम्ही इतर राज्यांतून ऑक्सिजन आयात केला होता. पण यावेळी आम्ही ऑक्सिजनची क्षमता वाढवत आहोत. राज्यातील कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये घट झाल्यामुळे, आम्ही चाचणी कमी केली आहे. आम्हाला त्याकडे लक्ष देण्याची आणि चाचणी वाढवण्याची गरज आहे. पुणे , अहमदनगर, सातारा आणि सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक सकारात्मक दर आहे. जे राज्यातील एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के आहे, असे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले आहेत.