झेंडा बदलला भूमिका नाही, काही लोक असा बदल करत सत्तेत गेले; राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला
Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

आम्ही केवळ झेंडा बदलला आहे, भूमिका नव्हे. मात्र, काही लोक आपली भूमिका बदल सत्तेत गेले आहेत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षास लगावला आहे. राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज (14 फेब्रुवारी 2020) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी औनौपचारिक चर्चा केली. या चर्चेवेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरं दिली. दरम्यान, अनौपचारिक चर्चेतही राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

अनौपचारिक गप्पांमध्य पत्रकारांनी राज ठाकरे यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांच्याशी आपले आजही राजकीय संबंध चांलले आहेत. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यास हरकत काय आहे. चांगले बदल व्हायला हवेत. ते बदल आपण स्वीकारायला हवे, असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, पुलवामा हल्ल्यात पुढे आलेले पुरावे संशयास्पद असल्याचेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, नाशिक शहरामध्ये 15,16 फेब्रुवारी दिवशी वाहतुकीच्या मार्गात बदल; राज्यस्तरीय वकील परिषद, उद्धव ठाकरे, छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमामुळे बंद राहणार 'हे' मार्ग)

मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या स्वागताचे होर्डिंग्ज लावताना त्यावर हिंदू जननायक असा आपला उल्लेख केला आहे. यावर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मला हिंदू जननायक म्हणू नका. दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे मनसे कार्यकर्त्यांनी धडाक्यात स्वागत केले आहे. त्यासाठी शहरांमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणांवर बॅनर, होर्डिंग झळकवले आहेत. त्यांवर ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावलीही लिहिली आहे. दरम्यान या होर्डिंग्जमुळे वाहतुकोंडीही झाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.