Raj Thackeray on Marathi Manoos: रायगड आपला राहणार नाही, लाचार नेते मिंधे झाले, सतर्क राहा; राज ठाकरे यांचा इशारा
Raj Thackeray | (Photo Credit: X)

Raj Thackeray On Cooperative Movement in Maharashtra: महाराष्ट्रावर गुजरातचा (Gujrat) डोळा आहे. मराठी माणूस (Marathi Manoos) एकत्र राहू नये यासाठी राज्याबाहेरुन प्रयत्न सुरु आहेत. सावध राहा. जमीन सांभाळा. त्या विकू नका. आजवरची सर्व युद्धे जमीनच्या तुकड्यासाठी झाली आहेत. त्या युद्धाचा अभ्यास म्हणजेच आपण इतिहास मानतो. त्यातून शिका. जमीनिचा तुकडा गेला तर कपाळावर हात मारण्याशिवाय काहीही बाकी उरणार नाही. हळूहळू तुमच्या जमीनी जातील मग तुमची भाषा संपेल तुम्हीच तुमची भाषा बोलणार नाही, असा सावधगिरीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. मनसे (MNS) तर्फे आयोजित सहकार शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. खास करुन रायगड (Raigad) जिल्ह्यात लक्ष द्या, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र अनेकांच्या डोळ्यात खुपतो आहे

सहकार शिबीरातून बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा लेचापेचा नाही. एकेकाळी देशातील मोठ्या प्रदेशावर सत्ता असलेला आणि सत्ता राबवणारा महाराष्ट्र आहे. सत्ताधीश महाराष्ट्र आहे. म्हणूनच तो अनेकांच्या डोळ्या खुपतो आहे. राज्यातील सहकार गुजरातला पळविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आज महाराष्ट्र जातीपातीत विभागला जातो. अशाने महाराष्ट्रचे तुकडे पाडण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच मराठी माणूस एकत्र आणि सतर्क राहायला पाहिजे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Raj Thackeray: प्रश्न अदानीला उत्तर चमच्यांकडून, शालीचे वजन पेलतंय का? मोदींनी चंद्रावरुन वाहतूक सुरु केली; उद्धव ठाकरे बरसले)

महाराष्ट्रानेच देशाला सहकार शिकवला

या देशाला सहकाराची देणगी महाराष्ट्राने दिली. महाराष्ट्रानेच देशाला सहकार शिकवला. त्यामुळे सहकार चालवायला आणि सांभाळायला महाराष्ट्रातील लोक समर्थ आहेत. हा इतिहास आहे. जो आपण समजून घेतला पाहिजे. नाहित वर्तमान हातून निघून जाईल आणि आपल्याला भविष्य उरणार नाही. आज मराठवाड्यातील स्थिती पाहा, तब्बल 800-900 फूट खणले तरी खाली पाणी नाही. तरीही तेथे ऊस पिकवला जातो. महाराष्ट्रातील पाणी अशाच पद्धतीने उपसले गेले तर मराठवाड्याचे आगामी काळात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत. पण आपले तिकडे लक्ष नाही, याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा, मुंबईतील मोठा प्रकल्प Adani Group कडेच का? Raj Thackeray यांचा सवाल; 'मविआ'च्या मोर्चा वर टीपण्णी)

सावध व्हा, शहाणपणाने निर्णय घ्या

पालघर , ठाणे , रायगड हातातून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली विमानतळं बांधली जात आहेत. मोठे रस्ते होत आहेत, असे असताना जमीनिंना सोन्याचा भाव येतो आहे. पैसा पाहून आपण जमीनिचे तुकडे विकत आहोत. पण, लक्षात घ्या जमीनि जर एकदा का गेल्या की त्या पुन्हा येणार नाहीत. आणि ज्यांनी त्या घेतल्या आहेत त्यांनाही हाकलता येणार नाही. त्यामुळे सावध व्हा. शहाणपणाने निर्णय घ्या. हळूहळू जमिनी गेल्या तर रायगड सुद्धा आपला राहणार नाही. कारण त्याच्या आजूबाजूची जमीनच आपली राहणार नाही, असेही राज ठाकरे यांनी या वळी आवर्जून सांगितले. (हेही वाचा, Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी कोण, कालांतराने पुढे येईल- राज ठाकरे)

व्हिडिओ

लाचार नेते मिंधे झाले

राज्यातील नेत्यांना महाराष्ट्राचे काहीही पडले नाही. हे सर्व लाचार नेते मिंदे झालेत. ते कोणत्याही पक्षातून कोणत्याही ठिकाणी जात आहेत. त्यांना कळतच नाही. त्यांनाच काय त्यांच्या घरच्यांनाही कळत नाही ते कुठे निघाले आहेत. त्यांनी मन आणि बुद्धी गहाण टाकली आहे. माझा मनसे सैनिक स्वाभिमानी आहे. तो आपला स्वाभिमान गहाण टाकणार नाही. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनीच सांगितले आहे, आपला शत्रू समुद्रामार्गे येईल, त्यामुळे त्या ठिकाणी गस्त वाढवा, आपल्यावर झालेले हल्लेही समुद्र मार्गेच झाले. त्यामुळे सावध राहा, असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.