Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करत आहेत. पण, अशा पद्धतीने कोणालाही कोणतेही आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही. मिळत नसते, हे मी त्यांच्या समोरही सांगूण आलो आहे. त्यांच्या आंदोलामागे कोण आहे हे कालांतराने पुढे येईल, असे सडेतोड वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते ठाणे येते आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले अनेकांचे जातीवर प्रेम असते. पण आपण जात हा प्रकारच मानत नाही. जातीने कोणाचेही भले झाले नाही. तसे उदाहरण पाहायला मिळत नाही, असेल तर दाखवून द्या, असेही ते म्हणाले.

नेत्यांना मतदारांची भीती वाटत नाही

राज्यातील विद्यमान राजकीय आणि एकूणच स्थितीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या जे काही चालले आहे ते अजिबात चांगले नाही. नेत्यांना मतदारांची भीती राहिली नाही. त्यामुळे ते लोकांना गृहीत धरतात. मतदार या गोष्टी हसण्यावारी घेऊन जातात. राज्यात मोठ्या प्रमाणावर जातीयता निर्माण झाली आहे. माझ्या पक्षात मी जात पाहात नाही. माणसाचे कर्तृत्व पाहून त्याच्यावर जबाबदारी देतो. माणूस जर कॅलीबचा असेल तर त्याला संधी दिली जाते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

'पदवीधर मतदारसंघातून पदवी नसलेला उमेदवारही लढतो'

दरम्यान, पदवीधर मतदारसंघातून निवडणूक घेतली जाते. पण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणारा उमेदवार पदवीधर नसला तरी चालतो, हे गणितच मला आजवर कळले नाही. लोकांना प्रश्न पडत नाहीत. त्यामुळे कोणीही, कसेही उमेदवार निवडून येतात. पूर्वी हे लोक (उमदेवार) किमान लोकांना वचकून असत. त्यामुळे जे काही करायचे ते लपूनछपून करत असत. पण आता कोणाचा धारबंदच राहिला नाही. लोकांची त्यांना भीतीच राहिली नाही. त्यामुळे कोणीही निवडून येतो. निवडून आल्यावर पक्ष बदलून कोणासोबतही सत्तेत जातो. हा काय प्रकार आहे, हेच कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही

राज्यासमोर बिकट अवस्था आहे. पण, एक गोष्ट मात्र निश्चित आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. जगामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. लोकांना वाटत असेल यांची सत्ता जाणार की नाही. पण त्यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले आहे. प्रदीर्घ काळ देशाच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची ही अवस्था होईल, अशी कोणी कल्पना तरी केली होती का? पण काग्रेसवर ह अवस्था आली ना? असा वास्तवदर्शी सवाल करत आगामी निवडणुकीत जनता काय विचार करते आणि कोणाला मतदान करते हेच मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.