राज ठाकरे यांची गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली; शेअर केलं खास पेन्सिल स्केच
Raj Thackeray

नाट्यकर्मी, अभिनेते, विचारवंत गिरीश कर्नाड (Girish Karnad ) यांचं वयाच्या 81 व्या वर्षी आज (10 जून) बंग़ळूरू मध्ये निधन झालं. परखडपणे आपली मत मांडणारा आणि संयत अभिनय कौशल्याने जगभरात छाप पाडणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून गिरीश कर्नाड यांची ओळख होती. आज त्यांच्या निधनानंतर समाजातील विविध स्तरातून दिग्गजांनी त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज ठाकरे

गिरीश कर्नाड यांच्या निधनाने 'निर्भीडपणे सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेणाऱ्या ह्या प्रतिभावान कलाकाराची नक्कीच उणीव भासेल' असं म्हणत श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोबतच विजय राऊत यांनी रेखाटलेलं खास पेन्सिल स्केच त्यांनी शेअर केलं आहे.

देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी

विनोद तावडे

उर्मिला मातोंडकर 

1998 साली गिरीश कर्नाड यांचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा आणि एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.