पनवेल रेल्वे स्थानकातील (Panvel Railway Station) एक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत एक अपंग व्यक्ती (differently-abled man) चालत्या ट्रेनमध्ये (Moving Train) चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, स्थानकात तैनात केलेले निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले. यामुळे ती व्यक्ती फ्लॅटफॉर्मवर पडली. मात्र मोठा अपघात टळला, हे स्पष्ट आहे. (Mumbai: सँडहर्स्ट रोड स्टेशन वर महिलेला वाचवण्यासाठी RPF जवानाची रेल्वे रुळावर उडी, Watch Video)
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकात एक अपंग व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ट्रेनमध्ये चढता न आल्याने ट्रेनसोबत ती व्यक्ती घसरत जाते. मागून निमलष्करी दलाचा जवान धावत येऊन त्या व्यक्तीला फ्लॅटफॉर्मवर खेचतो. जवानाच्या प्रसंगावधानामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ANI Tweet:
#WATCH | Maharashtra: Railway Protection Force personnel stopped a differently-abled man from boarding a moving train at Panvel station, yesterday.
(Video Source: RPF) pic.twitter.com/WPGWFa9ICQ
— ANI (@ANI) February 6, 2021
अशा प्रकारची एक घटना 30 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली होती. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका 76 वर्षीय व्यक्तीचा तोल गेला. परंतु, आरपीएफच्या जवानांनी तातडीने हालचाल करत त्याचा जीव वाचवला. मन्सूर अहमद असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वरुन पंजाब मेल ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ते होते.
कल्याण रेल्वे स्टेशनवर 6 जानेवारी रोजी आरपीएफच्या जवानामुळे एका पुरुष आणि महिलेचे प्राण वाचले. 1059 गोदान एक्स्प्रेस या गाडीतून खाली पडताना आरपीएफच्या जवानांनी त्यांना वाचवले.