Mumbai Local: कल्याण रेल्वे स्टेशनजवळ 'रेल्वे क्रॉसिंग पॉइंट' तुटला; मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई मध्य रेल्वे (Mumbai Local) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ (Kalyan Railway Station) 'रेल्वे क्रॉसिंग पॉइंट' (Railway Crossing Point) तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रामुख्याने मुंबई मध्य रेल्वे मार्ग आणि पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला आहे. रेल्वे क्रॉसिंग पॉइंट सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र, त्याला आणखी किती वेळ लागू शकतो याबाबत माहिती मिळू शकली नाही.

रेल्वे एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर जाण्यासाठी, मार्ग बदलण्यासाठी 'रेल्वे क्रॉसिंग पॉइंट' महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. मात्र, तो पॉइंटच तुटल्याने कोणत्याही प्रकारची रेल्वे पुढे जाऊ शकत नाही. रेल्वे पॉइंट नेमका कोणत्या कारणामुळे तुटला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. रेल्वे मार्गावर अनेक तांत्रिक गोष्टी असतात. त्या सुरळीत सुरु राहण्यासाठी विविध यंत्रणाती त्यावर निगराणी ठेऊन असतात. कामही करतात. मात्र कधी कधी अपवादात्मक स्थितीमध्ये अशा घटना घडतात.

दरम्यान, सायंकाळची वेळ असल्याने मुंबई लोकलला नेहमीच गर्दी असते. मुंबई आणि उपनगरांतून मुंबईतील विविध ठिकाणी काम आणि विविध कारणांसाठी सकाळी दाखल होणारा मुंबईकर सायंकाळी घरी परतत असतात. त्यामुळे सायंकाळ आणि सकळाच्या वेळी मुंबई लोकलवर नेहमीच ताण असतो. अशात जर लोकलचा खोळंबा झाला तर गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते.