रायगडमध्ये महाड येथील तारिक गार्डन इमारत काल (24 ऑगस्ट) संध्याकाळी कोसळल्यानंतर आजही एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान दैव बलवत्तर असलेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्याची आज 19 तासांनी मातीच्या ढिगार्याखालून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मोहम्मद बांगी असं या चिमुकल्याचं नाव आहे. दरम्यान त्याची सुखरूप सुटका झाल्याने स्थानिकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. मोहम्मद बांगी याला सध्या नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Raigad Building Collapse: तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी रायगड पोलिसांकडून 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल.
तारिक गार्डन इमारत काल 6.30 च्या सुमारास संपूर्ण जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप आहेत. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होते. अशामध्ये आता चार वर्षीय मोहम्मद बांगी सुखरूप बाहेर आला आहे.
ANI Tweet
#WATCH: A 4-year-old boy was rescued from under the debris at the site of building collapse in Mahad, Raigad. #Maharashtra pic.twitter.com/polMUhzmqN
— ANI (@ANI) August 25, 2020
दरम्यान तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांकडून 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तर नगर विकार मंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतकार्याला वेग देत अतिरिक्त फौजफाटा रायगडमध्ये पोहचवला आहे. सोबतच दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.