Rahul Narwekar | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar E-mail Hack) यांचा ई-मेल आयडी वापरुन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना एक मेल पाठविण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये विधानसभेत आमदार निट वागत नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, अध्यक्षांचा ईमेल आयडी हॅक झाल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यानंतर अवघ्या काहीच कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत विधानसभा अध्यक्षांनी मरिन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांची पोलिसात तक्रार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास सुरु असून याबाबत अद्याप कोणाला अटक झाल्याचे वृत्त नाही. राज्यपालांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये विधानसभेतील आमदारांची तक्रार करण्यात आली आहे. विधानसभेतील काही आमदार नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे या ईमेलमध्ये म्हटले आहे. दरम्यान, हा ईमेल विधानसभा अध्यक्षांनी पाठवलाच नाही. त्यांचे ई-मेल खाते हॅक झाल्याने हा प्रकार घडल्याचे काहीच वेळात लक्षात आले. (हेही वाचा, NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा)

हॅकिंग म्हणजे काय?

हॅकिंग म्हणजे संगणक प्रणाली, नेटवर्क, सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अनधिकृत प्रवेश, हाताळणी किंवा शोषण. हॅकर्स, हॅकिंग क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती किंवा गट, संवेदनशील माहितीवर अनधिकृत प्रवेश मिळविण्यासाठी, ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आणण्यासाठी किंवा सिस्टमचे नुकसान करण्यासाठी तंत्रज्ञानातील असुरक्षिततेचे शोषण करू शकतात. हॅकिंगचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यात आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान, कायदेशीर परिणाम आणि तडजोड केलेली गोपनीयता किंवा सुरक्षितता यांना धोकायांसारख्या बाबींचा समावेश आहे. तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतसे हॅकर्स नवीन तंत्र विकसित करतात आणि उदयोन्मुख असुरक्षिततेचे शोषण करतात, ज्यामुळे जगभरातील व्यक्ती, व्यवसाय आणि सरकारांसाठी सायबरसुरक्षा ही एक गंभीर चिंता बनली आहे. (हेही वाचा, Thane Cyber Fraud: ठाणे येथे MNC कंपनीचा MD सायबर चोरांच्या गळाला, कस्टम अधिकारी असल्याचे सांगून 4.80 कोटी रुपयांचा गंडा)

हॅकिंगचा धोका कमी करण्यासाठी, मजबूत सुरक्षा उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. ज्यामध्ये सॉफ्टवेअर आणि सिस्टम नियमितपणे अपडेट करणे, वापरकर्त्यांना सायबर सुरक्षा सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिक्षित करणे आणि संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, संस्था असुरक्षा ओळखण्यासाठी आणि सक्रियपणे संबोधित करण्यासाठी नैतिक हॅकर्स आणि सायबर सुरक्षा व्यावसायिकांना नियुक्त करू शकतात. अलिकडील काही काळात हॅकींगच्या घटना खास करुन सायबर क्राईम वाढत आहेत. त्यामुळे सरकारही नागरिकांना नेहमीच सतर्कतेच्या सूचना देत असते. नागरिकांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल नसलेली जागरुकता हा सायबर क्राईम आणि हॅकींगविरोधात लढण्याचा सर्वात मोठा धोका मानला जात आहे.