राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

अहमदनगर: कॉंग्रेसवर नाराज असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या होत्या. 12 एप्रिल म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपप्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे, राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर राधाकृष्ण पाटील काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता होती, मात्र ते कॉंग्रेसमध्येच राहणार आहेत.

आज, 12 एप्रिलला नरेंद्र मोदी हे नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. या सभेत राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील हे कॉंग्रेसचे जुने नेते आहेत, मी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून तेही पक्ष बदलतील असे नाही, माझा निर्णय हा फार वैयक्तिक होता, असे सुजय विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा)

राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जरी प्रवेश करणार नसले तरी, तरी ते अहमदनगरमध्ये त्यांचा मुलाचा म्हणजेच भाजप उमेदव्राचा प्रचार करताना दिसत आहेत. संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सुजय विखे यांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर सुजय यांच्या मातोश्रीही त्यांनाच निवडून द्या असा आग्रह मतदारांना करत आहेत. आजच्या मोदींच्या सभेची देखील राधाकृष्ण यांनी जोरदार तयारी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे.