राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

काँग्रेस (Congress) पक्षातील जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्षातील हायकमांडकडे आपला राजीनामा सोपवला असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी नुकताच भाजप (BJP) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर विखे पाटील राजीनामा देणार का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. यापूर्वी राजीनामा देणार नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु विखे यांनी पक्ष देऊ करेल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे म्हटले होते. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही विखे पाटील यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले होते.(हेही वाचा-सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशबद्दल राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'भाजप प्रवेशापूर्वी चिरंजीवांनी माझा सल्ला घेतला नाही')

तर नगर येथील जागेबद्दल कोणताही निर्णय झाला नाही तरीही शरद पवार यांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत वाईट होते. तसेच आघाडीमध्ये सदस्य आणि वडील हयात नसताना टिप्पणी शरद पवार यांनी करणे शोभनीय नव्हते. परंतु सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय त्याचा स्वत:चा असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले होते.