Pune Shocker: ऑनलाइन गेममध्‍ये वीस हजार रूपये हरल्याने तरुणाची आत्महत्या
Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

ऑनलाईन गेमिंगमधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक जण पैसे गमावत आहेत. यामुळे अनेक जण धक्कादायक पाऊल देखील उचलत आहे. मावळच्या तळेगावमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश काळदंते असं त्या व्यक्तीचे नाव आहे. मावळच्‍या तळेगावात वास्‍तव्‍यास असलेला गणेश काळदंते यास मोबाईलवरील जंगली रमी खेळायची सवय लागली होती. या ऑनलाईन रमीमध्ये तो वीस हजार रुपये हरला. गणेश हा कार चालक असून त्याला व्यसनही होते. त्यातच तो मोबाईलवर रमी खेळत असे. कमावलेले बहुतांश पैसे तो यातच उडवत असायचा. कुटूंबियांनी त्‍याला अनेकदा यापासून दूर ठेवायचा प्रयत्‍न देखील केला. परंतु, सवय लागल्‍याने तो सतत ऑनलाइन गेम खेळत होता.  (हेही वाचा - Mumbai Shocker: धक्कादायक! मुंबईत आरे कॉलनीत रिक्षा चालकाचा तरुणीवर बलात्कार; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक)

अशातच गणेश काळदंते  रमी मध्ये वीस हजार रुपये हरला. यामुळे आता तर घरचे चांगलेच भडकणार. याच टेन्शनमध्ये त्याने रविवारच्या सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती कुटुंबीयांनी तळेगाव पोलिसांना दिली आहे.  या घटनेमुळे परिसरात शोकाकुळ वातावरण झालेलेल पहायला मिळत आहे.