Mumbai Shocker: मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीत रिक्षात 20 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून तिला धमकावल्याच्या आरोपाखाली इंद्रजीत सिंग नावाच्या 24 वर्षीय रिक्षाचालकाला सोमवारी उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अटक करण्यात आली. याप्रकरणी आयपीसी कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बलात्कार करण्याआधी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपीने तरुणीला याबद्दल सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती सीबीडी बेलापूरला आपल्या मावशीच्या घरी गेली होती. तिथून तिने गोरेगावला जाण्यासाठी रिक्षा बूक केली होती. मात्र, आरे कॉलनीत पोहोचताच रिक्षाचालक तरुणीला घेऊन एका निर्जनस्थळी गेला. (हेही वाचा -Beed Teenager Suicide Case: चुलत्यासोबत शेतीच्या वादातून भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवत 20 वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या)
निर्जनस्थळी नेल्यानंतर आरोपी इंद्रजीतने पीडितेला मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला याबद्दल कोणाला काही सांगितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळानरुन पळून गेला. तो उत्तर प्रदेशात फरार झाला होता. अखेर त्याला उत्तर प्रेदशातून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे रिक्षाचालकाची चौकशी करून अटक केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर आरे कॉलनीत खळबड उडाली आहे.