पुणेकरांनो यंदा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात आपणास कडाक्याचा उन्हाळा जाणवला असेल. याकडे किरकोळ बाब समजून दुर्लक्ष करु नका. यंदा उन्हाचा चटका काहीसा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यात यंदा फेब्रुवारी 2023 मध्येच पाठिमागील 147 वर्षांमधील सर्वाधिक उन्हाची (Pune Temperature) नोंद झाली आहे. होय, दुपारी पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हाची पाठिमागील जवळपास दीड दशकातील सर्वात मोठी नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात यंदा नेहमीपेक्षा काहीसा अधिकच उन्हाळा जाणविण्याची शक्यता आहे. अनेक पुणेकरांना सर्दी, ताप, खोकला आदींचाही त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पुण्यात काहीसे आजारांचे प्रमाण वाढले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये यंदा पाठिमागच्या 147 वर्षांतील अधिक तपमानाची नोंद झाली. त्यामुळे आगामी काळात पुण्यात उष्णतेची लाट येऊ शकते. तसेच, पुढच्या काही काळात पुण्याचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, असेही आयएमडीने म्हटले आहे. महाराष्ट्राच्या दिशेने उत्तरेखडील भागातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमान वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. (हेही वाचा, अशा पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होऊ शकतात विपरित परिणाम)
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शक्यतो काम नसेल तर उन्हामध्ये बाहेर पडणे टाळायला हवे. जर घराबाहेर पडावेच लागले तर डोळ्याला गॉगल , डोक्यावर टोपी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवाय आहार अतिशय महत्त्वाचा. अतिशय थंड पदार्थ खाणे टाळावे. आहारामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असायला हवे. खास करुन ताक, लिंबू सरबत असे थंड पदार्थ खावेत किंवा प्यावेत. आरामदाई आणि सुती कपडे वापरावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातले लोक देतात. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने दुपारचे काम टाळावे. जनावरांना सावलीच्या ठिकाणी बांधावे. त्यांना पुरेशा प्रमाणात प्राणी मिळेल याचीही दक्षता घ्यावी, असा सल्या दिला जात आहे.