पुणे येथील माध्यमिक शाळेतील शिक्षण भरती घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. तपासात असे समोर आले आहे की, आरोपींना अनुदानित पदावर भरल्याची बाब उघडकीस आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. हा प्रकार आकुर्डी मधील नवनगर शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत घडला आहे. तसेच नोकर भरती करण्यात आलेल्या बनावट शिक्षकांना अनुदानिक पदावर भरल्याचे ही माहिती दिली गेली आहे.(औरंगाबाद: पासपोर्ट हरवल्याने पाकिस्तानच्या जेल मध्ये 18 वर्ष रहावं लागलेल्या 65 वर्षीय Hasina Begum मायदेशी परतल्या, म्हणाल्या 'स्वर्गात आले'!)
पोलिसांनी या बद्दल अधिक माहिती देत असे म्हटले की, माध्यमिक शाळेत खोट्या कागदपत्रांसह बेकायदेशीर पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात शिक्षकांची भरती करण्यात आली. परंतु यामधील शिक्षक घोटाळ्यातील मुख्य संभाजी यांच्या बँक खात्यात शिक्षकांनी मोठा रक्कमेत जमा केल्याचे उघडकीस आले. परंतु शिक्षकांची नोकर भरती करण्यात आल्यानंतर त्यांना नियुक्तीची बनावट कागदपत्र दिली गेली आहेत. तर नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना मान्यता पुणे जिल्हा परिषदेच्या रजिस्टरमध्ये दिसलेली नाही. (महाराष्ट्र प्रदुषण बोर्डाकडून पालघर मधील रसायन युनिट्स बंद करण्यासाठी धाडली नोटीस)
गोविंद दाभाडे हा नवनगर शिक्षण मंडळ संचालित शाळेचा संस्थापक आहे. तर चिखलीमधील संत तुकाराम महाराज माध्यमिक विद्यालय शाळेत सहा शिक्षकांना दाभाडे याने मान्यता दिल्याचे समोर आले आहे. या पद्धतीने आणखी काही शाळेत सुद्धा बनावट शिक्षक भरती केल्याचे दाभाडे याने पोलिसांना म्हटले आहे.