महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (Maharashtra Pollution Control Board) ने प्रदुषणासंदर्भात विविध नियमांचे कथित प्रकरणी उल्लंघन करण्याप्रकरणी पालघर मधील एका रसायन कंपनीला नोटीस धाडली आहे. ठाण्यातील एमपीसीबीच्या क्षेत्रीय कार्यालयाने 25 जानेवारीला नोटीस जाहीर करत एमआयडीसी, तारापूर मधील सेया इंडस्ट्रिज लिमिडेटला 72 तासांच्या आतमध्ये सर्व कार्यप्रणाली बंद करण्याचे आदेश दिले आहेत.(दिलासादायक! Bird Flu मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदतीचा हात; अंडी व पक्षीखाद्याच्या नुकसान भरपाईसाठी 1.30 कोटी मंजूर)
एमपीसीबीने रसायन कंपनीने गेल्या वर्षात एप्रिल महिन्यात एप्रिल ते ऑक्टोंबर दरम्यान प्रदुषण नियंत्रणासंदर्भातील विविध नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे नोटीसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना कंपनीची वीज आणि पाण्याची सुविधा बंद करण्यास म्हटले आहे. तर एमपीसीबीनुसार, इफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) चे सर्व युनिट्स गंजलेले असल्याचे आढळले आणि त्याची देखभाल योग्य नसल्याचे आढळले.(Weather of Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणेसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता; तापमानात घट)
Tweet:
Maharashtra Pollution Control Board has issued closure notice to chemical unit in Palghar for allegedly violating various norms
— Press Trust of India (@PTI_News) January 27, 2021
त्याचसोबत नोटीस मध्ये असे ही सांगण्यात आले आहे की, जर या नियमांचे पालन न केल्यास पर्यावरणाच्या कायद्यानुसार त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, गेल्या वर्षात कोरोना व्हायरस या जागतिक साथीच्या प्रसाराला रोखण्यासाठी योजलेल्या लॉक डाउनमुळे अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. गेल्या महिन्यात जगभरात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनामध्ये तब्बल 17 टक्क्यांची घट झाली आहे. एका नव्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत शास्त्रज्ञ म्हणतात की, जेव्हा सर्व जनजीवन सर्वसामान्य होईल, तेव्हा हवामान बदलाच्या संदर्भात प्रदूषणात झालेली ही अल्प-मुदत घट एखाद्या समुद्राच्या थेंबासारखी असेल. जर वर्षभर काटेकोरपणे लॉकडाउन पाळल्यास प्रदूषण पातळी 7% पर्यंत असेल आणि जर निर्बंध हटविले गेले तर ते 4% पर्यंत असेल.