एका किरकोळ वादातून चुलत भावाने आपल्या बहिणीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील रविवार पेठ (Ravivar peth)j येथे घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का मारले, याचा जाब विचारल्याने आरोपीने संबंधित महिलेला बेदम मारहाण केली. यामुळे तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सरकारवाडा पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दिगंबर उर्फ भय्या संजय चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. दिगंबरने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी मारले म्हणून त्याची चुलत बहीण चुलत बहिण आश्विनी सतीश चव्हाण ही जाब विचारण्यासाठी आली होती. दरम्यान, दिंगबरने अश्विनीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. यात तिच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर अश्विनी गेल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बुशुद्ध पडली. कुटुंबियांनी उपचार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथुन त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, 5 एप्रिल रोजी तिचा मत्यू झाला. आश्विनीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दिगंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: माहिम मच्छिमार कॉलनीत कडकडीत बंद, नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा घरात साठा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर याने 3 एप्रिल रोजी 6 वाजता किरकोळ वादातून आश्विनीच्या डोक्याचे केस धरून तिला फरशीवर आपटले होते. दरम्यान, आश्विनीच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली. त्यामुळे तिची प्रकृती खालावली, अशी फिर्याद आश्विनीच्या स्थानिक पोलिसांत दाखल केली होती. मात्र, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अश्विनीचा मृत्यू झाल्याने आरोपी दिगंबरला अटक करण्यात आली आहे.