Pune Road Accident: बेल्हा-जेजुरी महामार्गावर दुचाकीला टेम्पो धडकेत डोके माय-लेकाचा मृत्यू; सरपंच होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं
Accident (PC - File Image)

पुण्यामध्ये (Pune)  बेल्हा-जेजुरी महामार्गावर (Belha-Jejuri Highway) धामरी (Dhamri) परिसरामध्ये काल (3 फेब्रुवारी) च्या संध्याकाळी 7 वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये माय-लेकराचा आणि अन्य एका तरूणाचा करूण अंत झाला आहे. मृतांची नावं संकेत डोके, विजया डोके आणि चंद्रकांत सुक्रे आहे. एका टेम्पोची डोके यांच्या दुचाकीला धडक बसली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान विजया डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्या होत्या. त्या भविष्यात सरपंच होणार होत्या. ग्रामपंचातीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंचपदावर विराजमान होणार होत्या पण त्यापूर्वी झालेल्या या अपघातामध्ये त्यांचं निधन झाल्याने सरपंच होण्याचं त्यांचं स्वप्नं अधुरं राहिलं आहे. या अपघाताने डोके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. नक्की वाचा: Pune Road Accident: Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं; मुंबई-बंगळुरू हायवेवर ट्रकच्या धडकेत मृत्यू .

धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापूर भागामध्ये हा अपघात झाला आहे. संकेत डोके आणि ओंकार सुक्रे हे दोघेही लहानपणापासून जीवलग मित्र होते. पूजेच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.