Pune: घरफोडी, वाहनचोरी गुन्हांमध्ये बेपत्ता असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरामध्ये मागील काही दिवसांपासून वाहन आणि इतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. गेल्या काही दिवसांमध्ये यासंबंधित एकूण 12 घटना घडल्या होत्या. पुणे क्राईम ब्रॉंचने (Pune Crime Branch) या चोऱ्यांमध्ये लुटला गेलेला एकूण 13 लाखांचा माल हस्तगत केला आहे. यासंबंधी पुणे पोलिसांनी पिल्लू सिंह कालू सिंह जुनी (Pillu Singh Kalu Singh Juni) याला अटक केली आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या MCOCA आणि 6 इतर प्रकरणांमध्ये हा आरोपी बेपत्ता होता.

जुनीला अटक करण्यासाठी आम्ही एक शोध मोहिम सुरु केली. कोथरुड येथे पंचरत्न सोसायटीमधील दोन फ्लॅट्समध्ये चोरी केल्यानंतर जुनी आणि त्याच्या एका साथीदाराने दोन इसमांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला होता. 15 जुलै रोजी झालेल्या या घटनेमध्ये एक पोलिस कर्मीही  जखमी झाला होता., अशी माहिती पुणे क्राईम ब्रॉंचच्या युनिट 5 चे सिनियर इन्स्पेक्टर हेमंत पाटील यांनी दिली.

पुण्यामधील फुरसुंगी रोडवर आपल्या परिवाराला भेटण्यासाठी जुनी आला होता. ही खबर मिळताच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर जुनीने आपल्या सर्व गुन्हांची कबुली केली. हडपसर, कोंडवा, सहकार नगर, मार्केट यार्ड, स्वारगेट आणि सासवड भागामध्ये विविध प्रकारची चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

जुनी आपल्या दोन साथीदारांसह काही महिन्यांपासून गायब होता. कोथरुड पोलिसांनी त्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. Maharashtra Control of Organised Crime Act या अंतर्गत जुनी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.