
Pune News: काल रात्री महराष्ट्रात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होता. या पावसांत अनेकांचे नुकसान झाले दरम्यान पुण्यात (Pune) एका तरुणाला झाडाखाली थांबून चहा पिणं अंगावर बेतले आहे. झाडाखाली थांबून चहा पीत असताना अचानक झाडाची फांदी तुटून डोक्यात कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना पुण्यात ओंकारेश्वर येथे घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अभिजीत गुंज असं मृत तरुणाचे नाव होते, तो कसबा पेठे येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत मित्रांसोबत सायंकाळी ओंकारेश्वर मंदिराजवळ आला होता. रविवारी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने रविवारी ओंकारेश्वर मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मित्रांसोबत चहा पिण्यासाठी अभिजीत बाहेर आला. एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आला. पुण्यात अचनाक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान तो एका झाडाच्या जवळ उभा असलेल्या अभिजीतच्या डोक्यावर मोठी फांदी पडली.
घटनेत तो गंभीर जखमी झाला. मित्रांनी थेट रिक्षात बसवून त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी देण्यात आली. घटनास्थळी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.