Pune Horror: पुणे पुन्हा कोयता हल्ल्यानं हादरलं; टिळक रोड वर MPSC ची तयारी करणार्‍यावर हल्ला
Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

पुण्यामध्ये कोयत्याच्या हल्ल्याची मोठी दहशत मागील काही महिन्यांपासून आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठ परिसरामध्ये एका कॉलेजच्या विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आता काल (5 सप्टेंबर) दिवशी याचा भागामध्ये MPSC ची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यावर रस्त्यातील 3 गर्दुल्यांनी वार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मध्यरात्री 2 च्या सुमारास घडला होता.

विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन तासांतच आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. आरोपी हे 21-23 वर्षाचे तीन तरूण आहेत.

फिर्यादी आणि त्याचे मित्र सुभाष शेवाळे आणि ओम विलास भिलारे यांच्यासोबत पुण्यातील खजिना वीर परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये रात्री उशिरा दोघे लायब्ररी मधून घरी जात होते. शक्ती स्पोर्ट समोर पांढऱ्या रंगाची एक अ‍ॅक्टिव्हा आली त्यामध्ये आलेल्या तीन आरोपींपैकी एकाने कॉलर पकडून गाडी जवळ घेऊन गेला आणि गाडीवर ठेवलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. पानमळा परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यातील कोयता गँगचा मुद्दा विधीमंडळात देखील गाजला होता. त्यानंतर काही काळ या घटनांना ब्रेक लागला होता. पण आता या घटनेने पुन्हा खळबळ माजली आहे. पुण्यात कोयत्यांच्या विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई केली होती.