पुण्यात पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन कोरोनारूग्णाचा आकडा 'शून्य'; जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेवटचा डिस्चार्ज
New COVID-19 Centres (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रूग्ण पुण्यात (Pune) आढळला आणि बघता बघता राज्यात कोविड 19 (COVID 19) चं लोण पसरलं होतं. एकेकाळी गंभीर झालेली स्थिती आता निवळत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या (World Health Day) पूर्वसंध्येला पुण्यामध्ये महापालिकेच्या रूग्नालयात उपचार घेणार्‍या शेवटच्या रूग्णाला सुट्टी देण्यात आली. सध्या पुणे शहरात सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण नाही. 98 जण होम क्वारंटाईन (Home Quarantine)  आहेत. ते घरीच राहून उपचार घेत आहेत.

महाराष्ट्र सरकार कडूनही आता कोविड 19 निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने लोकांना मोकळीक मिळाली आहे त्यामुळे लोकांवरील, आरोग्य यंत्रणांवरील ताण सध्या हलका झाला आहे. काल नायडू रूग्णालयातून शेवटचा रूग्ण घरी पाठवण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Adar Poonawalla: योग्य लस निवडल्याने भारतात कोविड-19 चे रुग्ण कमी झाले, जाणून घ्या अदार पूनावाला असे का म्हणाले .

सध्या पुणे शहर आणि शहराबाहेरही एकही कोरोना रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल नाही. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार काल शून्य मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात कोरोना संकटामध्ये 9349 एकूण मृत्यू झाले आहेत तर 652498 जण आजारावर मात करून घरी परतले आहेत.