Photo Credit -X

Pune Firing: पुणे जिल्ह्यात लष्कराच्या एका निवृत्त अधिकाऱ्याचा भांडणादरम्यान रागावरील ताबा सुटला आणि त्याने हवेत गोळीबार(Bhor Firing) केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील पसुरे गावात ही घटना घडली. एस पी सिंग असे त्यांचे नाव असून ते लष्कराच्या ब्रिगेडियर पदावर असताना निवृत्त (Retired Brigadier )झाले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिगेडियर एस पी सिंग (निवृत्त) यांचे गावात एक रिसॉर्ट आहे आणि बुधवारी, रिसॉर्टसाठी नवीन वीजवाहिनी टाकण्याच्या कामावरूनच त्यांच्यात आणि गावातील शेतकऱ्यांमध्ये वाद झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाले. तेव्हा राग अनावर होऊन एस पी सिंग यांनी हवेत दोन राऊंड गोळीबार केला. (हेही वाचा: Sangli News: आंघोळीच्या साबणावरून वाद, बायकोने नवऱ्याला धू-धू धुतलं, प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं; सांगलीतील घटना)

ही घटना दुपारी 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा एस पी सिंग (निवृत्त) यांच्या गावातील रिसॉर्टसाठी  नवीन वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्या वीजवाहिनीसाठी काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात किंवा जवळ नवीन खांब बसवावे लागणार होते. त्यासाठी इतर शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे शेतामध्येच त्यांच्यात भांडण झाले. भांडणाच्या वेळी ब्रिगेडियरने आपल्या रायफलमधून दोन राऊंड फायर केले. या घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी रेकॉर्ड केला.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस स्टेशनचे निरीक्षक यांनी सांगितले आहे. “आम्ही कायद्या अंतर्गत कलमांबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहोत. यानंतर, आम्ही औपचारिक तक्रार करू,” असे ते म्हणाले.