Sangli News: आंघोळीच्या साबणावरून वाद, बायकोने नवऱ्याला धू-धू धुतलं, प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं; सांगलीतील घटना
Photo Credit - Pixabay

Sangli News: नवरा बायकोत कशामुळे वाद होतील सांगता येत नाही. त्यातही आजकालचा महिला वर्ग अत्याचार सहन करणार राहिला नाही. त्यामुळे नवऱ्याने मार खालल्यावरच तो शांत बसतो अशा घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. सांगलीतून अशीच एक घटना समोर आली आहे. आंघोळीच्या साबणावरून नवरा बायकोत वाद (Husband and Wife Argument )झाला. अन् बायकोने थेट नवऱ्याचा अंगठाच फोडला(Wife Broke Husband Thumb). अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या बायकोला साबण दिसला नाही. त्यामुळे तिने नवऱ्याला साबण कुठे ठेवला? असं विचारलं. नवऱ्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि उडवा उडवीची उत्तर दिली. याचं रूपांतर वादात झाला. त्यानंतर हाणामारीही झाली. हाणामारी दरम्यान, रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. त्यावर संतापलेल्या बायकोने स्वयंपाक घरातली पक्कड घेतली आणि थेट नवऱ्याचा अंगठाच फोडला. (हेही वाचा:Shopkeeper Attacked in Moshi: थकीत बिले भरण्यास सांगितल्याने ग्राहकाचा दुकानदारावर हल्ला, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video) )

८ मे रोजी ही घटना संजयनगर येथील पाटणे प्लॉटमध्ये घडली आहे. याप्रकरणी सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यातच १३ मे रोजी बायकोसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा बायकोमधील भांडणं (Husband Wife Dispute) काही नवीन नाहीत. मात्र एक साबणामुळे दोघांतील भांडणाच प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं हे आश्चर्यकारक आहे. भांडणादरम्यान, राग येवून बायकोने नवऱ्याला अपशब्द देखील वापरले होते. नवऱ्यानेही बायकोला शिवीगाळ केली.

बायकोने नवऱ्याच्या अंगठ्यावरच पक्कडीने वार केल्याने यामध्ये नवऱ्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे वाद नवराबायकोतला असूनही त्याचे सासू, सासरे, चुलत सासरे यांनी जावयाला दमदाटी केली. आमच्या मुलीला त्रास देतो, तुला सोडत नाही असं त्यांनी धमकावलं. त्यामुळे या नवऱ्याला नाईलाजाने पोलीस ठाणे गाठावे लागले.