Pune Fire Update (Photo Credits-ANI)

Pune Fire Update:  महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका इंडस्ट्रीयल क्षेत्रात रासायनिक कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये कंपनीतील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कामावर असलेल्या 37 कर्मचाऱ्यांपैकी 20 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. पीएमआरडीए पुण्यातील चीफ फायर ऑफिसर देवेंद्र पोटफोडे यांनी असे म्हटले की, प्लास्टिक पॅकिंग दरम्यान आग लागली. आगीमुळे धुराचे लोट ऐवढे बाहेर पडत होते की, एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. कूलिंग आणि सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे.

पीएमआरडीएच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, एसवीएस एक्वा टेक्नॉलॉजीजच्या कंपनीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. कंपनी विविध रसायनांचे उत्पादन आणि निर्यात करते. अग्निशमन विभागाने असे सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे.(Bandra East Building Structure Collapsed: वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळल्याच्या 2 दुर्घटना; एक जण दगावला)

Tweet:

या दुर्घनेप्रकरणी मोदी यांनी मृतांच्या परिवाराला 2 लाखांची मदत आणि 50 हजार रुपये जखमींच्या परिवाराला दिले जाणार आहेत.(पुणे विभागाच्या अंतर्गत येणारी सगळी पासपोर्ट सेवा केंद्र येत्या 15 जूनपर्यंत बंद राहणार)

Tweet:

दरम्यान, आग लागल्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी म्हटले की परिसरात प्लास्टिकच्या वस्तूंची पॅकेजिंग करण्यावेळी आग लागली. असा अंदाज लावला जात आहे की, पॅकेजिंगच्या काही भागात आग लागल्यानंतर ती सर्वत्र पसरली. त्याच कारणामुळे मोठी आग भडकली आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.