Mumbai Bandra East | Photo Credits : ANI

मुंबई च्या वांद्रे ईस्ट (Bandra East) भागात मागील काही तासांत रझाक  चाळ (Razzak Chawl) आणि खेरवाडीत 2 दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने एकाला जीव गमवावा लागला आहे. ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती मृत पावला असून अन्य 4 जण जखमी आहेत. दरम्यान जखमींना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी फायर आणि पोलिस विभागातील अधिकारी दाखल झाले आहेत.दरम्यान आमदार झिशान सिद्धीकीच्या ट्वीट नुसार मृत व्यक्ती हा 20 शी मधील होता.

वांद्रे ईस्ट भागात या दुर्घटनेनंतर कॉंग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी देखील सकाळी घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी ट्वीटर वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, फायर ब्रिग्रेडच्या मदतीला स्थानिकांनी येऊन डेब्रिज दूर करण्याचे प्रयत्न केले. यामध्ये कुणी व्य्कती अडकू नये यासाठी ते एकत्र काम आहेत. दरम्यान त्यांनी बीएमसी कडे कामगारांची कुमक मागितली पण साईटवर केवळ पालिकेचे 2 व्यक्ती उपस्थित होते असे त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान पालिकेने वांद्रे मध्येअजून एक अशीच दुर्घटना झाल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये खेरवाडीत घराची भिंत कोसळून 17 जण सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 5 जणं जखमी असल्याचं पालिकेने सांगितलं आहे.

मुंबई मध्ये आज पहाटे काही वेळ जोरदार पाऊस बरसला आहे. आणि या पहिल्या काही पावसांत दोन दुर्घटना समोर आल्या आहेत.