पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 151 किलोचा मोदक अर्पण
Dagadusheth Halwai Ganapati Temple 151 kg Modak (Photo Credits: ANI)

Ganeshotsav 209: पुण्याच्या (Pune) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची (dagdusheth Halwai Ganpati Temple) ख्याती सर्वांनाच माहित आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदाही मंदिरात दगडूशेठच्या गणपतीची प्रतिकृती विराजमान करण्यात आली आहे. या बाप्पाच्या चरणी आज सकाळी एका भाविकाने चक्क 151 किलोच्या मोदकाचा (Modak) नैवैद्य अर्पण केला. आज मंदिरात ऋषी पंचमी (Rishi Panchami) निमित्त मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी तब्बल 25 हजार महिलांनी सामुदायिकरीत्या अथर्वशीर्षाचे (Atharvshirsh) पठण केले होते तर आज रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत समस्त वारकरी जागर कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती महामोदक अर्पण केला आहे. काका हलवाईचे महेंद्र गाडवे व युवराज गाडवे यांनी हा महामोदक साकारला असून यात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्ख  लावून सजवण्यात आले आहे. हा मोदक बनवण्यासाठी 8 तासांची मेहनत व 15 कामगारांचे हातभार लागले आहेत.

 दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गणेशोत्सवाचे LIVE दर्शन

यंदा दगडूशेठ मंदिरात वेद, पुराणे, शास्त्र यावर आधारित सजावट करण्यात आली आहे. उंच शिखरे व मंडप असलेले सूर्यमंदिर उभारण्यात आले आहे. स्तंभ, माळांची तोरणे, सिंह, लक्ष्मी या साऱ्याने मंदिर सजवले आहे. याशिवाय हत्ती, सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र या प्रतिकृतींचा देखील सुशोभीकरणात वापर करण्यात आला आहे. या सुंदर सजावटीच्या मधोमध सुवर्ण सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आहे.