Online Job Scam Pune: ऑनलाईन माध्यमातून झालेल्या ओळखीतून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा, असा सावधानतेचा ईशारा नेहमीच दिला जातो. तरीही अनेक लोक ऑनलाईन माध्यमातून भेटलेल्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि पुढे स्वत:चाच कपाळमोक्ष करुन घेतात. पुणे येथील 22 वर्षीय क्रिप्टो व्यवसायिकास (Pune Crypto Trader Loses) नुकताच याचा अनुभव आला. X (पुर्वीचे ट्विटर) च्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून या व्यवसायिकाने एका अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवला. सदर व्यक्तीने सूचवलेले ॲप डाउनलोड केले आणि मोबाईलमध्ये स्टोर केले. या ॲपच्या माध्यमातून या तरुण व्यवसायिकास तब्बल 2.5 लाख रुपयांचा फटका बसला. नावेद अलम असे या तरुणाचे नाव आहे. त्याने स्वत:ला आलेला अनुभव X वर कथन केला आहे. (Pune Cryptocurrency Fraud)
नावेद आलम याने आपला अनुभव X वर शेअर करताना म्हटले की, एका नियोक्याने (employer) सूचवल्यानुसार आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड केले. हे ॲप डाउनलोड करताच माला 2.5 लाख रुपयांचा फटका बसला. मी ट्विटरवर एका ऑनलाईन घोटाळ्याला बळी पडलो आणि तब्बल 3000 डॉलर गमावले. जागरूकता वाढवण्यासाठी आणि इतरांचीही माझ्याप्रमाणे फसवणूक होऊ नये, यासाठी मी माझ्यासोबत घडलेला प्रसंग इथे कथन करत आहे. (हेही वाचा, Cambodia Cyber Slaves: नोकरी, पैसा याच्या नावाखाली ऑनलाईन क्राईम; कंबोडियामध्ये हजारो नागरिक बंदीवान; बनवले सायबर गुलाम)
एक्स हँडलच्या माध्यमातून आपल्यासोबतचा अनुभव शेअर करताना नावेद याने चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, @crankybugatti on Twitter माझ्याकडे @SocialSpectra नावाच्या वेब3 कम्युनिकेशन ॲपशी संबंधित एका कंपनीतील डिझाइन भूमिकेबद्दल माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यातून आमचा संवाद सुरु झाला. समोरील व्यक्तीने माझ्याशी संवाद वाढवला. विश्वास बसण्यासाठी कायदेशीर गोष्टींचा उल्लेखही केला. बेसिक डिझाइन प्रश्न विचारले गेले. ज्याची मी उत्तरे दिली आणि ते माझ्या कामाने प्रभावित झाले. (हेही वाचा, Online Fraud Training: अवघ्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने 500 तरुणांना दिले ऑनलाइन फसवणुकीचे प्रशिक्षण; टेलीग्राम चॅनेल आणि इतर तंत्रे ऑपरेट करण्यास शिकवले, पोलिसांकडून अटक)
थोड्या काळाने समोरील व्यक्तीतच्या कंपनीतून एचआरचा फोन आला. तसेच, पुढील संवाद कायम करण्यासाठी मला एक लिंक पाठविण्यात आली. या लिंकबाबत मला माहिती नव्हते. मी अनभिज्ञ असल्याने मी त्या लिंक ओपन केली आणि एक ॲप डाउनलोड केले. नंतर मला कळले की, तो एक सापळा होता. मला सांगण्यात आले की, कॉल इन-हाऊस कम्युनिकेशनसाठी हे आमचे स्वतंत्र ॲप आहे. मी ते डाऊनलोड करताच मालवेअरने माझे क्रिप्टो वॉलेट काढून टाकले तसेच, स्टॅक केलेली मालमत्ता काढून टाकली. पुढच्या काही क्षणात मी 3000 डॉलर भारतीय रुपयांत जवळपास 2.5 लाख रुपये गमावले.
एक्स पोस्ट
Recently, I fell victim to a scam on Twitter and lost $3000. Sharing my story to raise awareness and prevent others from going through the same ordeal.
— Naved Alam (@Navedux) March 31, 2024
नावेद आलम सावधानतेचा सल्ला देत सांगतो की, ऑनलाईन माध्यमातून कोणाच्याही संपर्कात येताना सावध राहा. पटकण कोणावरही विस्वास ठेऊ नका. ऑनलाईन नोकरी, काम, सेवा आदी गोष्टींचे आमिष दाखवले जात असेल तर त्याची आपल्या पातळीवर पडताळणी करुन घ्या. जोपर्यंत स्त्रोताची पूर्ण माहिती आणि खात्रीपूर्व स्त्रोत मिळत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेऊ नका. मी आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि माझ्यासोबत विश्वासघात झाला.