Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

प्रेम, नातं, संबंध ह्याला नाजूक पध्दतीने न हाताळल्यास ते कायम गमावण्याची शक्यता असते. पण नातं संपल्यावर  ते स्वीकारण हे देखील मोठी जबाबदारी असते. पुण्यात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक तरुण-तरुणी गेले काही महिन्यांपासून रिलेशनशीप मध्ये होते पण सततच्या भांडणामुळे अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ब्रेकअप झालं. दोघही विभक्त झाल्यानंतर आपआपलं आयुष्य स्वतंत्र्य पध्दतीने जगू लागले. पण काही दिवसांनंतर मुलाने मुलीस धमकी देवून तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. मुलीने मुलास अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तरी पठ्ठ्याने मुलीच्या विनवनींना न जुमानता तिचा छळ करत राहीला. तोच मुलीने तरुणा विरुध्द तक्रार करण्यासाठी मार्केट यार्ड पोलिस स्थानकात धाव घेतली आणि संबंधीत सगळा प्रकार सांगत तरुणाविरुध्द तक्रार दाखल केली.

 

मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्याचं कळताचं विकृत तरुणाने थेट स्वतच्या व्हॉट्सअप स्टेटसला मुलीचा म्हणजेचं त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचा नग्न फोटो शेअर केला आणि येतो बस शुरुवात है असं कॅप्शन दिलं. तरी या प्रकरणी तरुणावर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आरोपीचं नाव देवेंद्र फुलपगारे असुन हा  मुळ शिरुर येथील रहिवाशी आहे. तरी सध्या पुण्यातील कोंडवा परिसरात हा तरुण वास्तव्यास आहे. (हे ही वाचा:- Dhule: धुळे येथे पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या)

 

पुण्यात घडलेला हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. हल् सोयबर क्राईमच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुन्हेगारांना जणु कायद्याची भितीचं उरलेली नाही अशा घटना कानावर पडत आहेत. तरी पोलिसांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी तरुणीने केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करुन या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना चाप बसवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहेत.