
पुण्यात (Pune) दिवसाढवळ्या एका कुख्यात गुंडांची डोक्यात गोळी घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील एकलहरे (Eklahare) भागात आज (1 ऑगस्ट) घडली आहे. भरदिवसा पुण्यात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत झालेला व्यक्ती हा मंचर येथील एका हमालाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी होता. या प्रकरणी मंचर पोलीस (Manchar Police) अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखिले असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आज दुपारच्या वेळेत या कुख्यात गुन्हेगाराला थेट गोळीच घालण्यात आली आहे. या हत्येमागे नेमके कोण होते? याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात एकच खळबळ! कुख्यात गुंड पप्पू वाडेकर आणि अक्षय किरतकिर्वे यांची एकाच दिवशी हत्या
पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. पुण्यात गेल्या महिन्यात एकाच दिवशी दोन कुख्यात गुडांची हत्या करण्यात आली होती. राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची खेड-राजगुरू नगरमध्ये हत्या करण्यात आली आहे. तर, अक्षय किरतकिर्वे या गुडांची दत्तवाडी परिसरात हत्या झाली होती. या दोघांचीही पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.