पुण्यात (Pune) एकाच दिवशी दोन कुख्यात गुडांची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (12 जुलै 2020) घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार, राहुल उर्फ पप्पू वाडेकर (Pappu Wadekar) या तडीपार गुंडाची खेड-राजगुरू नगरमध्ये हत्या करण्यात आली आहे. तर, अक्षय किरतकिर्वे (Akshay Kiratkirve) या गुडांची दत्तवाडी परिसरात हत्या झाली आहे. या दोघांची पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पुणे पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन गुंडांच्या हत्या झाल्याचे एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- पुणे: आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्याला बाहेरच्यांकडून धमक्या
कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याची हत्या
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पप्पू वाडेकर याच्या पिस्तुलातून गोळीबार करत आणि डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना राजगुरू नगर शहरालगत पाबळ रोडे येथे घडली. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजगुरू पोलीस घटना स्थाळी दाखल झाले. तसेच जुन्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांना संशय आहे.
कुख्यात गुंड अक्षय किरतकिर्वे याची हत्या
पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास अक्षय किरतकिर्वे याची हत्या करण्यात आली आहे. चौघा जणांच्या टोळक्याने भरदिवसा अक्षय किरतकिर्वे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला. अक्षय किरतकिर्वे याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ग्रामीण भागातीरल टोळीयुद्ध काही गुंडांच्या तडीपारीनंतर थांबले होते. ग्रामीण भागातील लहान वयातील गुन्हेगारी, टोळीयुद्ध संपण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काही टोळींना तडीपार केले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.