आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या पुण्यातील (Pune) एका जोडप्याला धमक्या देण्यात येत आहेत. विवाह नोंदणी कार्यालयातील नोटीस बोर्डावरचा अर्ज नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाला या लग्नावरुन एकच वादंग निर्माण झाला. या प्रकरणाला लव्ह जिहादचा (Love Jihad) रंग देत संबंधित तरुण-तरुणीला बाहेरुनच धमक्या देण्यात येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबियांचा या लग्नाला होणार आहे. मात्र बाहेरुन येणाऱ्या धमक्यांमुळे सध्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील एका मुस्लिम तरुण आणि हिंदु तरुणीने लग्न करण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर नोटीस बोर्डावरचा अर्ज नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या दोघांना धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे ही नोटीस नेमकी कोणी व्हायरल केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (नांदेड: 25 लाखांची रोकड आणि 74 तोळ्यांचे दागिने घेऊन 19 वर्षीय मुलीचे प्रियकरासोबत पलायन)
दरम्यान, दोन्ही कुटुंबियांची लग्नाला परवानगी असताना विरोध करणारे बाहेरचे कोण? असा सवाल आता सुजान नागरिक हिंदुत्ववाद्यांना विचारत आहेत. तर या प्रकरणी राईट टू लव्ह ही संस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. तसंच तरुण-तरुणींनी अजिबात घाबरु नये. धमक्यांना भीक घालू नये, असे आवाहन राईट टू लव्ह संस्थेकडून करण्यात येत आहे. तसंच या जोडप्याला संस्थेने पाठिंबा दर्शवला आहे.
यापूर्वी नाशिक मधून देखील अशाप्रकराची घटना समोर आली होती. मुस्लिम मुलगा आणि हिंदू तरुणी यांच्या लग्नाची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर मुलींच्या कुटुंबियांना धमक्यांचे फोन येऊ लागले. लग्न रद्द करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जावू लागला. तसंच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात येत आहेत.