Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोवॅक्सिन (Covaxin)  बनवणारी कंपनी भारत बायोटेकची (Bharat Biotech) सहाय्यक कंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड यांनी अशी अपेक्षा केली आहे की, पुण्यातील मंजरी स्थित एक प्लांटमध्ये वॅक्सिनच्या प्रोडक्शनची सुरुवात केली जाईल. तर हे प्लांट ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत सुरु होणार आहे. एका वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पुणे येथील संभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी असे म्हटले की, बुधवारी प्लांटच्या येथे दौरा केला होता. बॉम्बे हायकोर्टाने नुकत्याच बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या प्रोडक्शनसाठी मंजरी येथे 12 हेक्टरच्या भूखंडात आधीपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या लसीचा प्लांट ताब्यात घेण्याची परवानगी दिली होती.

राव यांनी पुढे असे म्हटले की, प्लांटचा आधारभूत पाया तयार अवस्थेत आहे. कंपीनीची आणखी एक खासियत म्हणजे ते खुप दक्षता घेत असून त्यांची टीम सुद्धा यामध्ये सहभागी आहे. त्यामुळे मला असे वाटत नाही की, उत्पादन सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाया तयार करण्याची गरज नाही. येथे सर्वकाही व्यवस्थित आहे. दरम्यान, बायोवेटचे अधिकारी प्लांटमध्ये उपलब्ध असलेल्या आधारभूत पायाचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत यावरील अभ्यास पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे राव यांनी सांगितले.(Drive In Vaccination Center In Nagpur: सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मध्ये 60 च्या वरील नागपूरकरांना 'ड्राईव्ह इन वॅक्सिंनेशन' च्या माध्यमातून मिळणार कोविड 19 ची लस)

केंद्र आणि राज्य सरकार कडून कंपनीला परवाना, मंजूरी. नियामक निर्णयासंबंधित पूर्ण पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, ऑगस्टच्या अखेर पर्यंत प्लांट सुरु झाल्यास लसीचा पहिला साठा मिळेल. नुकत्याच हायकोर्टाने असे म्हटले होते की, कोविड19 ची स्थिती पाहता संबंधित प्राधिकाऱ्यांना हा प्लांट बायोवेट यांना सोपवावा. या प्लांटचा यापूर्वी वापर अमेरिकेची बहुराष्ट्रीय औषध कंपनी मर्क अॅन्ड कंपनी एक सहाय्यक इंटरवेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करत होती असे राव यांनी म्हटले आहे.