Accident (PC - File Photo)

Pune Accident: वाढत्या थंडीमुळे राज्यात सर्वत्र धुकांची चादर पसरत चालली आहे. दरम्यान धुक्यामुळे अपघात होणाची शक्यता वाढत चालली आहे. याच दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. पुणे नाशिक (Pune- Nashik) महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही अपघात घडला. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, पुण्याकडे भरधाव चाललेल्या क्रुझर गाडीला मंचर येथील जीवन मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भरधाव चाललेली क्रुझर गाडीची पुढे जाऊन मालवाहू टेम्पोला पाठीमागच्या बाजून जोरदार धडक बसली.या अपघात भीषण होता. या अपघातात तीन जण जागेवर मरण पावले. तर पाच जण जखमी झाले. यामध्ये दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंचर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. (हेही वाचा- रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, अपघात कॅमेऱ्यात कैद)

चालक पंकज खंडू जगताप ३६, मधुकर तुकाराम अहिरे ५२, शांताराम अहिरे या तिघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास धुकांची चादर सर्वत्र पसरील असताना ही दुर्घटना घडली. दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेन चालली होती. मात्र, धुक्यामुळे क्रुझर वाहन चालकाला पुढील मालवाहू टेम्पो दिसला नाही. भरधाव क्रुझरची धडक लागली. क्रुझरमध्ये असलेल्याचा चालकासह तीघांचा मृत्यू झाला. क्रुझर मधील प्रवाशी नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यासाठी निघाले होते.