पुणेकरांचा लाईफलाईन (Pune Lifeline) समजली जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या (PMPMLA) काही कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. पीएमपीएमएलच्या 36 कर्मचाऱ्यांचं प्रशासनाने निलंबन केलं आहे. वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल 36 कर्मचार्यांना निलंबित केले आहे. पुण्यातील 15 डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 36 कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड खराब असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे या 36 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये 30 कंडक्टर आणि 6 चालकांचा समावेश आहे. (हेही वाचा - Pune Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ)
या सोबतच कोणतीही पूर्वसूचना न देता 22 जुलैपासून गैरहजर राहिलेल्या एकूण 142 कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये यामध्ये 78 कंडक्टर व 64 चालकांचा समावेश आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळावी या हेतूने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल कडून सांगण्यात आले आहे. पीएमपीएमएलचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) सचिंद्र प्रताप सिंग यांनीही याच मुद्द्यावरून तीन कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत.