Mumbai: महाविकास आघाडीने आज १ सप्टेंबर २०२४ रोजी जोडो मारो आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी मविआ आज आंदोलन करणार आहे. रविवारी हुतात्म चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. संपुर्ण शहरात आज मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. (हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागून मोकळे, कारवाईबाबत मौन; छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनभावना तीव्र)
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून बंद राहणार आहे. आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून मुंबई पोलिस बंदोबस्त करण्यासाठी तैनात झाले आहे.
महाविकास आघाडीच्या आंदोलनात शिवसेना गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आज भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहेत. आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहे. यापूर्वी सिंधुदुर्गातील मालवण परिसरात झालेल्या शिवाजी महाराज पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती.