Prithviraj Chavan (Photo Credits: Twitter)

सातार्‍याचे राष्ट्रावादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)  यांनी आज (14 सप्टेंबर) खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आज सकाळी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा दिल्लीमध्ये भाजपा पक्षप्रवेश पार पडला. आता रिक्त झालेल्या या जागेवर पुन्हा निवडणूक होणार आहे. यासाठी राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chauhan) यांचं नाव आघाडीवर आहे. सध्या राज्यात युतीमध्ये आयारामांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस -राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडत चालले आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघ कॉंग्रेससाठी सोडल्याची चर्चा रंगली आहे. प्राप्त माहितीनुसार आता उदयनराजे भोसले विरूद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत होऊ शकते. उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर NCP आमदार जीतेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया; शरद पवारांनी बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं म्हणत टीकास्त्र

खासदारकीचा राजीनामा देत बाहेर पडलेल्या उद्यनराजेंच्या एक्झिटनंतर सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार श्रीनिवास पाटील  अशी काही नावं चर्चेमध्ये होती मात्र त्यांच्याकडून हिरवा कंदील न मिळाल्याने अखेर पृथ्वीराज चव्हाण निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख होती. माजी राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे या जागेवरून 2 टर्म जिंकून आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळाला होता. मात्र आता त्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीसाठी हे मोठं नुकसान आहे.