PM Modi (Photo Credit - ANI)

Banjara Heritage Museum: पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) येत्या 5 ऑक्टोबर रोजी वाशिम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. दौऱ्यावर असताना बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिराला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Banjara Heritage Museum)चे उद्घाटन करणार आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे आणि परंपराचे दर्शन घडवणारा या नंगारा वास्तूसाठी महायुती सरकारने 725 कोटी रुपये मंजूर केले आहेत.  या उद्घटनावेळीस महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लाखो बंजारा समाजेचे लोक उपस्थित राहणार आहे. (हेही वाचा-  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर; Pune Metro, Solapur Airport सह 22,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे करणार राष्ट्रार्पण)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळा ऐतिहासितरित्या पार पडणार आहे.  बंजारा विरासत नंगारा लोकार्पण सोहळ्याला देशाचे पंतप्रधान यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री तसेत राज्याचे इतर मंत्री, धर्मगुरु, महंत, साधुसंत उपस्थित राहणार आहे.  बंजारा समाजासाठी हा उत्साहाचा दिवस राहणार आहे.

बंजारा हेरिटेज म्युझियम

नंगारा वाद्य आकाराची प्रतिकृती असलेली या वास्तूला जागतिक दर्जा देण्यात आला आहे. ही वास्तू पाच मजली असणार आहे. यात पारंपारिक आणि लोकसंस्कृतीला पुढे नेणाऱ्या वस्तू संग्राहायला असणार आहे. सरकारने या वास्तूसाठी 725 कोटी रुपये मंजुर केले आहे.