Praniti Shinde:पुलवामा हल्ल्यावरील 'त्या' विधानामुळे प्रणिती शिंदेंवर होणार कारवाई? भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Praniti Shinde (PC - Facebook)

Praniti Shinde: सोलापूर(Solapur Constituency) खासदार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सोलापूरमध्ये पार पडलेल्या सभेत प्रिणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ला(Pulwama attack) वरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. 'पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता' असे भर सभेत प्रणिती शिंदे यांनी म्हटले होते. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या या विधानाविरोधात भाजपकडून निवडणूक आयोग(Election Commission)मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. (हेही वाचा :Praniti Shinde On BJP : भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, देश ५० वर्ष मागे गेला; सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आक्रमक)

पुलवामा हल्ल्याचा इतिहास

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदने घडवून आणल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे आरडीएक्स या स्पोटकानं भरलेले आत्मघाती वाहन जवानांच्या बसला धडले आणि आरडीएक्स या स्पोटकामुळे तेथे मोठा स्फोट झाला होता. या वाहनामध्ये 100 किलो आरडीएक्स होतं अशी माहिती नंतर समोर आली.

प्रणिती शिंदे नेमके काय म्हणाल्या?

प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये पुलावामा हल्ल्याचा उल्लेख दहशतवादी हल्ला म्हणून केला. '2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हा हल्ला घडवून आणल्याचा दावा अधिकारीच करतात असं म्हटलं. मागच्यावेळी पुलवामा घडवलं. त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही. कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तामधून... वा... एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. यातूनच त्यांची मानसिकता कळते,' असं प्रणिती म्हणाल्या होत्या. पुढे बोलताना त्या म्हणालया की, 'जेव्हा त्यांना कळतं की आपली बाजू कमी आहे त्यांची जास्त आहे. लास्टमध्ये त्यांना काही मिळालं नाही तर जातीमध्ये तेढ निर्माण करतात. सावधा राहा!' असं प्रणिती शिंदे या भाषणा म्हणाल्या. पुलवामा हल्ल्यावरील याच विधानाविरोधात निवडणूक आयुक्तांकडे भाजपाने तक्रार नोंदवली आहे.