निसर्ग चक्रिवादळापासून यावर्षी महाराष्ट्रातील मॉन्सूनच्या (Maharashtra Monsoon) प्रवासाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन महिन्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. राज्यात 1 जून ते 31 जुलै यादरम्यान 538.5 मीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 5 टक्के अधिक पाऊस बसरला आहे. राज्यात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत जुलैअखेरपर्यंत 7 टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र, पुढील 4, 5 दिवसात मुंबई, नवी मुंबई, कोकणात मुसळधार (Very Heavy Rains) ते अतीमुसळधार (Extremely Heavy Rains) पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात सरासरी 104 टक्के पाऊस बरसणार असल्याचे अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
यावर्षी जून, जुलै महिन्यात अनेक भागात जोरदार पाऊस हजेरी लावतो. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. एवढेच नव्हेतर, साधरण 15 ऑगस्टनंतर अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता यापूर्वी हवामान विभागाने वर्तवली होती. यामुळे सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे. हे देखील वाचा- Mumbai Water Cut: मुंबई सह ठाणे, भिंवडी भागामध्ये 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात
ट्वीट-
पुढच्या 4,5 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता. सोमवार पासून जोरदार. घाट भागात पण अतीमुसळधारची शक्यता.
IMD
Possibility of Very hvy to Extremely hvy rains over Konkan including Mumbai, Thane, NM frm 2-5 Aug
Ghat areas too.
IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/XuDN8JyINQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2020
मागील 24 तासात राज्यात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर, मराठवाड्यात काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. शहरात मध्यवर्ती मध्यवर्ती भागासह उपनगरांकडे श्रावणसरी बरसल्या आहेत. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.