Manmohan Singh Investments | | Image used for representational purpose | (Photo credit: archived, edited, representative image)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh Demise) यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) संध्याकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. हे वृत्त कळताच त्यांना सर्व राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात आली. भारताच्या आर्थिक उदारीकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंग यांच्या दिल्लीतील एम्स येथे झालेल्या निधनामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (Hd Devegowda), राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

एका समर्पित अर्थतज्ज्ञ आपण गमावला: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी-एससीपी) प्रमुख शरद पवार यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या संवादाची आठवण करून देत तीव्र दुःख व्यक्त केले.

"आज देशातील जनता दुःखात आहे. देशासाठी काय चांगले आहे याचा ते विचार करायचे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यावेळी मी त्याच्याशी बोलायचे. तेव्हापासून मला त्यांच्याबद्दल आदर होता ", देशाच्या कल्याणासाठी सिंह यांची बांधिलकी अधोरेखित करताना शरद पवार बोलत होते. (हेही वाचा, Manmohan Singh Financial Planning: मनमोहन सिंग यांची संपत्ती, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, मुदत ठेवी आणि बचत)

मनमोहन सिंह यांच्या धोरणांमुळे असंख्य लोकांच्या आयुष्याला स्पर्श: एच. डी. देवेगौडा

माजी पंतप्रधान आणि जनता दल (एस) चे नेते एच. डी. देवेगौडा यांनी अर्थमंत्री असताना सिंग यांच्या अभूतपूर्व आर्थिक धोरणांवर प्रकाश टाकला. "ते अर्थमंत्री झाले तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. मला उदारीकरण आणि खाजगीकरण या सर्व पायऱ्या माहीत आहेत. त्यांनी देशाची सेवा केली आणि असंख्य लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला ", असे देवेगौडा म्हणाले. (हेही वाचा, Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे वयाचे 92 व्या वर्षी निधन)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी डॉ. सिंग यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाचे सांत्वन कलेले आणि डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री शोक व्यक्त करत म्हटले की, "भारत आपल्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो". अर्थमंत्री म्हणून सिंग यांच्या कार्यकाळात 1991 च्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली, ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणले. विनम्रता आणि समर्पणासाठी ओळखले जाणारे सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि त्यांच्या नेतृत्वासाठी जागतिक स्तरावर आदर मिळवला.

दरम्यान, वयाशी संबंधित वैद्यकीय गुंतागुंतीमुळे डॉ. सिंग यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांना घरी अचानक बेशुद्ध झाले, असे अहवालात म्हटले आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासावर एक अमिट छाप सोडणाऱ्या एका युगाचा अंत झाला आहे.