बीकेसी (BKC) भागातील वाहतूक कोंडी मधून नागरिकांची सुटका करण्यासाठी आता पॉड टॅक्सी (POD Taxi) हा नवा वाहतूकीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. पॉड टॅक्सी च्या उपक्रमाला एमएमआरडीए (MMRDA) कडून परवानगी देण्यात आली आहे. बीकेसी मध्ये 8.8 किमी भागामध्ये ही पॉड टॅक्सी चालवली जाणार असून या द्वारा वांद्रे (Bandra) ते कुर्ला (Kurla) स्थानकादरम्यान प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. एका पॉड टॅक्सी मध्ये सुमारे 6 प्रवासी करू शकतील. 38 स्थानकांदरम्यान ही पॉड टॅक्सी चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रायव्हरलेस असलेली ही पॉड टॅक्सीची सेवा परदेशामध्ये यूएई, यूके मध्ये पहायला मिळाली आहे. पॉड टॅक्सीचा वेग हा 40 किमी प्रति तास असणार आहे. तर मुंबई मध्ये हा प्रोजेक्ट PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप मध्ये केला जाणार आहे. Atal Setu वरील अतिउत्साही वाहन चालकांचे वायरल फोटोज पाहून MMRDA ने नागरिकांना ट्वीट करत 'सेल्फी साठी ब्रीज वर न थांबण्याचं' केलं आवाहन!
असा आहे पॉड टॅक्सीचा प्रोजेक्ट
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान '#पॉड_टॅक्सी' धावणार असून त्याचे अंतर ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. pic.twitter.com/0S5Bh7UTZX
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 5, 2024
बीकेसी मध्ये कामाच्या निमित्ताने सुमारे 4 लाख लोकं नियमित प्रवास करत असतात. यामध्ये रिपोर्ट्स नुसार सुमारे 1.04 लाख लोकं 2031 पर्यंत पॉड टॅक्सी सेवेचा वापर करू शकणार आहेत. या प्रवासासाठी प्रति किलोमीटर साठी 21 रूपये दर असण्याचा अंदाज आहे. पॉड टॅक्सी केवळ बीकेसी मध्ये उतरणार्यांसाठी फायद्याची नाही तर याचा फायदा दोन स्थानकादरम्यानही प्रवास सुकार होणार आहे.