
दोन दिवसांपूर्वी PMC बॅंकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आता सामान्य खातेदारांसोबतच अनेक सोसयटींचे फंड देखील अडकले आहेत. आरबीआयच्या आदेसानुसार आता कर्ज आणि ठेवींच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच दर दिवसा केवळ 1000 रूपये काढण्याची मुभा असल्याने आता अनेकांना आर्थिक चणचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये निवासी संकुलांचादेखील समावेश आहे. PMC बॅंकेवर RBI चे निर्बंध: जाणून घ्या खातेदार 1000 रूपयांपेक्षा अधिक पैसे का काढू शकणार नाहीत?
को ऑपरेटिव्ह सोसायटींच्या 'बाय लॉ" नियमानुसार, सोसायटींना नजिकच्या बॅंकेमध्ये अकाऊंट काढणं गरजेचे आहे. यामध्ये लाखो, कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली जाते. सोसायटीप्रमाणेच अनेक क्रेडीट सोसायटीदेखील आपले पैसे गुंतवतात. हाच प्रकार मुंबईमधील अनेक पीएमसी बॅंकेच्या शाखांमध्ये आहे.
मागील काही वर्षांपासून को ऑपरेटीव्ह बॅंका डबघाईला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये रूपी बॅंक, सीकेपी बॅंक. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांचा समावेश आहे. यापैकी अनेक बॅंका या महाराष्ट्रातील काही दिग्गजांच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे निवडणूकंच्या तोंडावर अनेक बॅंका बंद पडतात. मुंबईत सुमारे 35,00 हाऊसिंग सोसायटी आहेत त्यापैकी 80% सोसायटींची अकाऊंट्स प्रामुख्याने को ऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये आहेत. त्यामुळे पीएमसी बॅंकेवर आलेल्या निर्बंधानंतर आता अनेक सोसयटीमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सायनमधील 36 सोसायटींच्या नागरिकांचे सुमारे 5 कोटी रूपये पीएमसी बॅंकेमध्ये अडकले आहेत.अनेक लहान मोठ्या व्यवहारांसाठी बॅंकांना सुमारे 2 ते 2.5 लाख रूपये दरमहा आवश्यक असतात. याद्वारा सोसायटीचा खर्च, पाण्याचं बिल भरलं जातं.मात्र आता ज्या खातेदारांचे पैसे पीएमसी बॅंकेमध्ये अडकले आहेत त्यांच्यासमोर हे आर्थिक व्यवहार कसे करयचे हा प्रश्न पडला आहे.
राष्ट्रीयकृत बॅंकेच्या तुलनेत को ऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये व्याजदर अधिक मिळतो. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वेळा आणि इतर सेवा याच्यापेक्षा को ऑपरेटीव्ह बॅंका अधिक सोयीस्कर असतात त्यामुळे अनेकदा सोसायटी को ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये आपले पैसे ठेवण्याला प्राधान्य देतात.