कोरोना संकटापाठोपाठ आता इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये कच्चा तेलाचे दर भडकल्याने सहाजिकच इंधनाचे दर देखील दिवसागणिक वाढत आहेत. यामुळे मुंबई, दिल्ली, चैन्नई सारख्या भारतातल्या मेट्रो सिटीमध्ये सर्वसामान्यांचं आर्थिक गणित गडबडलं आहे. ऑईल मार्केंटिंग कंपनींच्या रिटेल प्राईजमध्ये वाढ झाल्याने महाराष्ट्रात मुंबई शहरात पेट्रोलचा दर प्रति लीटर मागे 90.34 रूपये तर डिझेलचा दर हा 80.51 रूपये प्रति लीटर नोंदवण्यात आला आहे. नवी मुंबई मध्ये हाच दर पेट्रोलसाठी 90.17 तर डिझेलसाठी 80.35 रूपये प्रतिलीटर आहे. महाराष्ट्रात केवळ मुंबई, नवी मुंबई नव्हे तर सुमारे 25 शहरांमध्ये आज पेट्रोलचा प्रती लीटर दर हा 90 रूपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये नागपूर, नाशिक, अमरावती, रत्नागिरीचा समावेश आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यांत भारतातील सर्वाधिक पेट्रोलचा दर हा प्रति लीटर 92.47 रूपये आहे. तर डिझेल देखील 80 रूपयांच्या पार आहे.
पेट्रोलचे दर 22 सप्टेंबर पासून तर डिझेलचे दर देखील 2 ऑक्टोबरपासून स्थिर होते. मात्र आज आठवड्याच्या सुरूवातीलाच पेट्रोलच्या दरात 30-33 पैसे तर डिझेलच्या दर 25 ते 31 पैसे वधारला आहे.
भारतामधील प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचा प्रति लीटर दर काय?
मुंबई - पेट्रोल 90.34 रूपये, डिझेल 80.51 रूपये
दिल्ली - पेट्रोल 83.71 रूपये, डिझेल 73.83 रूपये
कोलकत्ता - पेट्रोल 85.19 रूपये
चैन्नई - पेट्रोल 77.44 रूपये
दरम्यान नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची मूळ रक्कम ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्यावर शहरानुसार टॅक्स प्रमाणे आणि अन्य करांनुसार किंमती वर खाली होत असतात. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हे इंधनाचे दर बदलतात. त्यामुळे योग्य दर जाणून घ्यायचा आल्यास तुम्हांला ऑनलाईन अॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून दर पाहता येऊ शकतात.
कसे पहाल अचूक दर?
तुमच्या शहरानुसार अचूक दर पहायचे असतील तर इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर,बीपीसीएल RSP-डीलर कोड- 9223112222 वर, एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 वर इथे मेसेज करू शकतो. तसेच ऑईल कंपन्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iocl.com, www.bharatpetroleum.com, www.hindustanpetroleum.com वर देखील दर पाहण्याची सोय आहे.